बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन बच्चू कडूंशी साधला संवाद

Written by:Astha Sutar
Published:
बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. त्यामुळं त्यांची तब्बेत खूपच खालावत चालली आहे. आज मंत्री बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली. यावेळी त्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली.
बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन बच्चू कडूंशी साधला संवाद

Chandrashekhar Bawankule – सध्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांच्या उपोषण आंदोलनाचा आज ६ वा दिवस आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, आदी प्रश्नावर कडू हे आंदोलन करताहेत. गेल्या ५ दिवसांपासून सरकारने दखल घेतली नाही, मात्र आज बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. आणि बच्चू कडूंशी चर्चा केली.

मुख्यमंत्री बोलले फोनवरुन…

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी माजी बच्चू कडू हे आक्रमक होत अमरावतीत उपोषण करताहेत. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पाठींबा दिला आहे. तर बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. त्यामुळं त्यांची तब्बेत खूपच खालावत चालली आहे. आज मंत्री बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली. यावेळी त्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंसोबत फोनवरुन चर्चा केली. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. पण आपण उपोषण मागे घ्यावे, असे फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती मिळतेय.

बळीराजा हताश आणि निराश…

दुसरीकडे बच्चू कडूंच्या या उपोषणाला अनेकांनी पाठींबा दिला आहे. काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिलेला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलं आहे.राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. काँग्रेस पक्षही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहे. असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews