रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; 10.9 लाख कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा

Written by:Rohit Shinde
Published:
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना १,८६६ कोटी रुपयांचा प्रोडक्टीव्हीटी लिंक्स बोनसला मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी १०.९० लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; 10.9 लाख कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा

सार्वजनिक क्षेत्रात (सरकारी नोकऱ्या, रेल्वे, बँका, विमा कंपन्या इ.) दिवाळी बोनस किंवा उत्पादकता-संबंधित बोनस सरकारकडून दरवर्षी ठरवला जातो. यासाठी वित्त मंत्रालय किंवा संबंधित मंत्रालय अधिकृत परिपत्रक जारी करते. बोनसची रक्कम साधारणतः ठराविक दिवसांच्या पगारावर आधारित असते, जसे की ३० किंवा ४० दिवसांच्या वेतनाएवढा बोनस. हा बोनस थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. अगदी याचप्रमाणे यंदा देखील सरकारी रेल्वेसेवेतील जवळपास ११ लाख कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे.

पात्र कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना १,८६६ कोटी रुपयांचा प्रोडक्टीव्हीटी लिंक्स बोनसला मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी १०.९० लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेय की हा बोनस त्यांच्या ७८ दिवसांच्या वेतना इतका असणार आहे. गेल्यावर्षी देखील मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांचा बोनस मंजूर केली होता,त्यामुळे ११,७२, २४० कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला होता.

एका पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसाच्या कमाल देय रक्कम १७,९५१ रुपये आहे. ही रक्कम विविध प्रकारच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यात रेल्वे ट्रॅक मेन्टेनर, लोकोमोटीव्ह पायलट, ट्रेन मॅनेजर ( गार्ड ), स्टेशन मास्तर,सुपरवायझर, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉईंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि अन्य सी ग्रुप कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलासा

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा देत बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सुमारे १०.९ लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीचे खर्च भागविणे सुलभ होईल आणि कुटुंबासोबत सण उत्साहात साजरा करता येईल. रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचारी समाधान आणि विश्वास वाढला आहे. दिवाळीपूर्वी मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे रेल्वे कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत आनंद, उत्साह आणि समाधानाने दिवाळीचा सण साजरा करू शकतील.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews