मुंबईतुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत मोनोरेल ट्रेनच्या (Monorail Accident In Mumbai) चाचणी दरम्यान एक अपघात झाला. वडाळा-जीटीबी नगर स्थानकावर सिस्टीम ट्रायल दरम्यान रेल्वे रुळावरून घसरली. आज सकाळी ९ वाजता हि दुर्घटना घडली. या अपघातानंतर मोनोरेलचा डब्बा हवेतच झुकल्याचे पाहायला मिळालं. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल (एमएफबी) आणि महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. .
कोणीही जखमी नाही – (Monorail Accident In Mumbai)
एमएमएमओसीएलने स्पष्ट केले की ही घटना त्यांच्या चालू तंत्रज्ञान अपग्रेडेशन कार्यक्रमाचा भाग असलेल्या प्रगत सिस्टम ट्रायल दरम्यान घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन सिग्नलिंग चाचण्यांमधून जात होती तेव्हा रुळ बदलत असताना हा अपघात झाला आणि ट्रेन थोड्या प्रमाणात एका बाजूला झुकली. या टेस्टिंग दरम्यान, ट्रेनमध्ये कोणीही प्रवासी उपस्थित नव्हता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही किंवा कोणी जखमी झालं नाही. नागरिकांना घाबरू नका अशी विनंती एमएमएमओसीएल कडून करण्यात आली आहे. कारण ही अंतर्गत, नियंत्रित चाचण्या आहेत आणि ऑपरेशनल फेल गेलेलं नाही असे असे निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीही मोनोरेल मध्ये अडचणी –
मोनोरेलच्या मार्गावर वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी (Monorail Accident In Mumbai) आणि अपघातांच्या मालिकेत ही आणखी एक भर पडली आहे. यामुळे मोनोरेलच्या सुरक्षिततेच्या आणि देखभालीच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या काही वर्षांत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि वारंवार होणाऱ्या सेवा व्यत्ययांमुळे प्रवाशांचा विश्वास कमी झाला होता. यापूर्वी २० ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात चेंबूर आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान एक ट्रेन बिघाडली. यामध्ये ५०० हून अधिक प्रवासी अडकले आणि त्यांना वाचवण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा १५ सप्टेंबर रोजी, वडाळाजवळ आणखी एका मोनोरेल ट्रेनमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित बिघाड निर्माण झाला, ज्यामुळे १७ प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढण्यात आले. त्या दिवशी सेवा दोन तासांहून अधिक काळ अंशतः विस्कळीत होती.





