दोन-तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामाने विभागाने काय म्हटलंय?

Written by:Astha Sutar
Last Updated:
सध्या पाणी याचा साठा झाला आहे पण पेरणीसाठी पाऊस नसल्याने शेताऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी मान्सून सक्रिय झाल्यावर १५ जूननंतर पेरणीचा निर्णय घ्यावा. असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील चार दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
दोन-तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामाने विभागाने काय म्हटलंय?

State Rain – मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली होती. २६ मे रोजी मुंबई, उपनगर, गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल झाला होता. यावेळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र राज्यातील अनेक भागात पाऊस पोहचलाच नव्हता. यानंतर पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. मात्र आता राज्यात दोन-तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे हवामाने विभागाने काय म्हटलंय आहे.

१३ जूनपासून पुन्हा धो-धो…

दरम्यान, सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा १३ जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांत अद्यापपर्यंत पोहोचू शकला नाही. निम्मा महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असला तरी अनेक भागात पाऊस पडला नाही आहे. तसेंच राज्यातील अनेक भागात मे महिन्यात हजेरी लावत १२४ वर्षात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे हा एक पावसाने रेकॉर्ड केला होता. अनेक वर्ष्यानंतर मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याची नोंद झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी दिल्यामुळे बळीराजा चिंतेत असून, पेरणीच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्यात पावसाची शक्यता कुठे?

दुसरीकडे राज्यात मे महिन्यात  प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला. १२४ वर्षांतील सर्वांत ओला महिना म्हणून नोंद झाली आहे. १३ जूननंतर उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. शेतकरी पेरणीसाठी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे. मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे, असा अंदाज लावला जात आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews