आणखीन लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता, राज्य सरकारने अर्थ मंत्रालयाकडून मागवली माहिती

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
राज्य सरकारने निकषाची छाननी, वार्षिक आर्थिक उत्पन्न या पडताळणीसाठी राज्याच्या वित्त विभागाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, लाडक्या बहिणींचे आर्थिक वर्षाचे उत्पन्नाची माहिती मागवली आहे.
आणखीन लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता, राज्य सरकारने अर्थ मंत्रालयाकडून मागवली माहिती

Ladki Bahin Yojana – विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली होती. या योजनेला राज्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. मात्र या योजनेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते. बोगस अर्ज दाखल करुन याचा फायदा घेतल्याच्या घटना समोर आल्या होता. दरम्यान, जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत विविध कारणावरुन ११ लाख महिलांना अपात्र करण्यात आल्यानंतर आता आणखीन लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे.

अर्थ मंत्रालयाकडून माहिती मागवली…

दरम्यान, या योजनेत ज्या महिला नियम आणि निकषात बसत नाहीत, त्यांनीही या योजनेला लाभ घेतला आहे. असे सरकारच्या निर्दशनास आले आहे. नुकताच शासकीय कर्मचारी असलेल्या दोन हजारापेक्षा अधिक महिलांनी याचा लाभ घेतल्याचे धक्कादायक समोर आल्यानंतर राज्य सरकारने निकषाची छाननी, वार्षिक आर्थिक उत्पन्न या पडताळणीसाठी राज्याच्या वित्त विभागाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, लाडक्या बहिणींचे आर्थिक वर्षाचे उत्पन्नाची माहिती मागवली आहे. पुढील १० दिवसांत केंद्र सरकारकडून अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आणखीन लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींचे आकडेवारी काय सांगते?

  • या योजनेत सुमारे २ कोटी ६५ लाख लाभार्थी महिलांची नेांदणी
  • २.५० कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा
  • एप्रिलपर्यंत ९ हप्ते म्हणजे १३ हजार ५०० रुपये खात्यात जमा
  • मे महिन्याचा लाभ अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा नाही
  • योजनेच्या अटींनुसार महिला बाल विभागाकडून काटेकोरपणे पडताळणी सुरु
  • आतापर्यंत राज्यातील ११ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात
  • लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग आदी विभागातील निधी हिकडे वळवला होता

किती लाडक्या बहिंणी अपात्र…

१ लाख ६० हजार : चारचाकी वाहने असलेल्या महिला योजनेतून बाद

७ लाख ७० हजार : नमो शेतकरी योजनेचा घेणाऱ्या महिला अपात्र

२ लाख ३० हजार : संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिला

१ लाख १० हजार : ६५ वर्षापेक्षा जास्त वय

२६५२ : सरकारी नोकरीतील महिला

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews