मुंबईकरांसाठी मुंबई काँग्रेस राबविणार ‘मुंबई विरासत मिलन’ उपक्रम, वर्षा गायकवाड यांची घोषणा

Written by:Astha Sutar
Published:
''मुंबई विरासत मिलन'' या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील मुंबईकर आणि उत्तर भारतीयांपर्यंत समस्या, त्यांचे दैनंदिन प्रश्न आदी मुंबई काँग्रेस जाणून घेणार आहे, तसेच सोडविण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत.
मुंबईकरांसाठी मुंबई काँग्रेस राबविणार ‘मुंबई विरासत मिलन’ उपक्रम, वर्षा गायकवाड यांची घोषणा

Mumbai Congress – मुंबई काँग्रेसमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या धरतीवर मुंबईकर आणि उत्तर भारतीयांपर्यंत पोहचण्यासाठी मुंबई काँग्रेस ”मुंबई विरासत मिलन” हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उत्तर भारतीयांचे तसेच मुंबईकरांचे रोजचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे.

मीही मराठीतूनच शिकले….

मुंबईत मराठी बोलले पाहिजे, किंवा शाळेत मराठी विषय शिकवला पाहिजे, याबाबत मी देखील आग्रही आहे. माझे शिक्षण मराठीत झाले आहे. मीही मराठीत शिकले आहे, त्यामुळं मुंबईत जे राहत असतील त्यांना मराठी आले पाहिजे, याबाबत काही दुमत नाही, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. उत्तर भारतीयांना मराठी भाषेबद्दल मारहाण केली जात आहे, यावर विचारलेल्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले.

अधिवेशनातून जनतेच्या हाती काही नाही

अधिवेशनातून सामान्य लोकांना काहीच मिळाले नाही. आम्हाला वाटले होते की, लोकांच्या हिताचे निर्णय होतील, पण तसे काही झाले नाही. पण आम्ही एक आमदार गोपीचंद पडळकर मीडियासमोर पाहिजे तसे वक्तव्य करताहेत. आम्ही पाहिले की, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात हाणामारी आणि मारामारी पाहिली… सरकारमधील एक आमदार जेवण मिळाले नाही म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण करतोय…आम्ही पाहिले की एक मंत्री खुलेआम सिगारेट पित आहे… हे पाहिले. अशी टीका खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर केली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews