MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

23 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई-गोवा कार फेरी सेवा; रेल्वेने कार कोकण, गोव्यात घेऊन जाता येणार

Written by:Rohit Shinde
Published:
कोकण रेल्वेने एक खास योजना आणली आहे. 23 ऑगस्टपासून रेल्वेची विशेष कार फेरी सेवा कोकण आणि पुढे गोव्यापर्यंत सुरू होणार आहे.
23 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई-गोवा कार फेरी सेवा; रेल्वेने कार कोकण, गोव्यात घेऊन जाता येणार

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे मोठे हाल होतात. चारचाकी वाहनधारकांना आपल्या गावाकडे जाताना विशेष त्रास होतो. यावर आता कोकण रेल्वेने एक खास सेवा आणली आहे. नेमकी ही योजना कशी असणार आहे? ते जाणून घेऊ…

23 ऑगस्टपासून रेल्वेची विशेष सेवा

आता तुम्ही स्वतःच्या कारने रेल्वेने कोकणात जावू शकताऐकायला थोडं विचित्र वाटते नापण हे खरंयही सेवा 23 ऑगस्टपासून रेल्वेची ही विशेष सेवा सुरू होणार आहेगणेशोत्सवासाठी नागरिकांना या सेवेचा वापर करता येणार आहेयामुळे प्रवास तर सुलभ होणारच आहे पण प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.

कोकण रेल्वेकडून मुंबई ते गोव्या दरम्यान ही नवीन सेवा सुरू करत आहेत. तुमच्या मालकीची कार तुम्ही रेल्वेने कोकणातील गावी घेऊन जाता येणार आहे. महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णापर्यंत ही सेवा सुरू असेल. तसंच, यामुळं 20-22 तासांचा प्रवास रस्ते मार्गाचा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण होणार आहे.

पण, खर्च नेमका किती होणार?

एका ट्रेनमध्ये साधारण 40 कार घेऊन जाता येतीलतरयाचे शुल्क 7,875 प्रति कार इतके असेलया गाड्या बेल्टने बांधल्या जातीलसुरक्षिततेसाठी हँडब्रेक लावले असतील याची खातरजमादेखील केली जाईलमात्र प्रवासादरम्यान कोणालाही कारमध्ये बसण्याची परवानगी नसणारतरप्रवाशांना त्यासोबतच असलेल्या प्रवासी कोचमधून प्रवास करता येणार आहेप्रत्येक गाडीत जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी आहे.

3AC मध्ये दोन आणि SLR मध्ये एका व्यक्तीला बसता येईल. 3AC चे भाडे 935 रुपये आहेतर सेकंड क्लासचे भाडे 190 रुपये आहे. अशी सूचना आहे. ट्रेन कोलाडवरुन संध्याकाळी मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वेर्णा येथे पोहोचणार आहे. 

प्रवाशांना ट्रेन निघण्यापूर्वी साधारण 2 – 3 तास आधी पोहोचणे गरजेचे आहे. ट्रेनमध्ये खास 20 डबे असतील. तर, प्रत्येक वॅगनमध्ये दोन गाड्या ठेवता येतील. ही सेवा सुरू होण्यासाठी किमान 16 गाड्यांची बुकिंग आवश्यक आहे. प्रवाशांसाठी ही सेवा विशेष फायदेशीर ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात या सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.