बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे म्हणत काँग्रेसने अधिकृतपणे ट्विटर हँडलवरुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी समोर
मुंबईत काँग्रेसने अखेर आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिका निवडणूकांसाठी वंचित सोबत आघाडी केली आहे. या आघाडीमुळे काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड नाराज असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील 29 महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महायुती आणि आघाडीत चढाओढ सुरु आहे. त्यातच महायुतीच्या विरूद्ध उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु असतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला असताना आता वंचित सोबत आघाडी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा…
आपली मुंबई घडवूया…
मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया..#Mission2026 #Mumbai… pic.twitter.com/y8X1hRLL1m— Mumbai Congress (@INCMumbai) December 29, 2025
महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल काही दिवसांपूर्वी वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६





