Mumbai Nagpur Special Train : मुंबई–नागपूर मार्गावर नवीन विशेष एक्सप्रेस; 15 प्रमुख स्थानकांना जोडणार

Published:
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या सर्व स्थानकांवरून प्रवाशांना थेट मुंबई–नागपूर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
Mumbai Nagpur Special Train : मुंबई–नागपूर मार्गावर नवीन विशेष एक्सप्रेस; 15 प्रमुख स्थानकांना जोडणार

Mumbai Nagpur Special Train : मुंबई ते नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सध्या रेल्वे प्रवासातील वाढती गर्दी, सणासुदीच्या काळातील ताण आणि विदर्भ–मुंबई मार्गावरील प्रवाशांची मोठी मागणी विचारात घेऊन या मार्गावर दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांमुळे मुंबई, खानदेश आणि विदर्भदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कस असेल वेळापत्रक (Mumbai Nagpur Special Train)

या विशेष गाड्यांपैकी पहिली गाडी क्रमांक 02139 ही 25 जानेवारीच्या मध्यरात्री 00.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणार आहे. ही गाडी सकाळी जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर नियोजित थांबा घेऊन दुपारी 03.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 02140 ही त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.30 वाजता CSMT, मुंबई येथे आगमन करेल. हे वेळापत्रक विशेषतः शनिवार–रविवार, सण–उत्सव आणि वाढत्या यात्रेच्या काळात प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

कोणकोणत्या स्थानकावर थांबा

या विशेष एक्सप्रेसला एकूण 15 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या सर्व स्थानकांवरून प्रवाशांना थेट मुंबई–नागपूर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या विस्तृत थांब्यांमुळे मार्गावरील सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेळेत प्रवासाचा पर्याय मिळेल. Mumbai Nagpur Special Train

या विशेष गाडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारचे डबे जोडण्यात येणार आहेत. यात एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा डबा, सहा वातानुकुलित तृतीय श्रेणीचे डबे, नऊ शयनयान डबे, चार सामान्य श्रेणीचे डबे, एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश असेल. संपूर्ण रचना एलएचबी कोचेसची असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान होणार आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे वाढती गर्दी, आरक्षणाचा ताण आणि तिकिटांची अतिरिक्त मागणी यावर मोठ्याप्रमाणात उपाय होणार आहे. विदर्भ आणि खानदेश विभागातील प्रवाशांसाठी ही सेवा विशेषतः दिलासा देणारी ठरेल. मुंबई–नागपूर मार्गावरचे प्रवास नियोजन आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी होणार असल्यामुळे या निर्णयाचे स्वागत सर्वच प्रवासी करत आहेत.