Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रवास होणार आणखी सोप्पा

Published:
सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा सहा पदरी आहे. मात्र रस्त्यावरील  गाड्यांची वाढती संख्या बघता अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अशावेळी प्रवाशांचा प्रवास सोपा आणि आरामदायी व्हावा यासाठी आता राज्य सरकारने या एक्सप्रेसवे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रवास होणार आणखी सोप्पा

Mumbai Pune Expressway : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो. मुंबई आणि पुणे ही दोन्हीही राज्यातील महत्त्वाची शहरी आहेत. दोन्ही ठिकाणी औद्योगिक तसेच इतर कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. साहजिकच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा सहा पदरी आहे. मात्र रस्त्यावरील  गाड्यांची वाढती संख्या बघता अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अशावेळी प्रवाशांचा प्रवास सोपा आणि आरामदायी व्हावा यासाठी आता राज्य सरकारने या एक्सप्रेसवे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे सरकारचा प्लान – (Mumbai Pune Expressway)

सध्या सहा पदरी असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला आणखी चार पदरी जोडण्याचा राज्य सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच हा एक्सप्रेसवे आता 10 पदरी होणार आहे. जेणेकरून वाहनांची वाहतूक कोंडी कमी होईल. सुमारे ९५ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेला चार पदरी जोडण्यासाठी अंदाजे १४,२६० कोटी रुपये खर्च येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या संदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे. सरकारने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर नियोजनानुसार निविदा प्रक्रिया पार पडल्या तर २०३० पर्यंत एक्सप्रेसवेमध्ये चार नवीन लेन जोडले जातील,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

दररोज लाखो गाड्यांचा प्रवास –

मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक महामार्ग आहे. १ एप्रिल २००२ रोजी उद्घाटन झालेल्या या महत्त्वाच्या एक्सप्रेसवेमध्ये सध्या सहा लेन आहेत. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या एक्सप्रेसवेवर दररोज ८०,००० ते १००,००० वाहने प्रवास करतं असतात.परंतु आठवड्याच्या शेवटी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते.  2020 मध्ये, द्रुतगती महामार्गावरील 190 वर्षे जुना अमृतांजन पूल वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाडण्यात आला. परंतु वाहनचालकांची तक्रार कायम आहे.  विशेषतः जुन्या मुंबई-पुणे महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणाऱ्या भागात अधिक वाहतूक कोंडी होते.