मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं वेळापत्रक ‘हे’ वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील व पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं वेळापत्रक ‘हे’ वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (२२.०६.२०२५) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दरम्यान, माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दुसरीकडे हार्बर रेल्वेवर देखील मेगा  ब्लॉक घेण्यात आला आहे. मानखुर्द आणि नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा ११.१५ ते १६.१५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.१८ ते १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३७ ते १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मानखुर्द आणि पनवेल – नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.