मुंब्रा लोकल अपघाताचा अहवाल समोर; अहवालात अनेक धक्कादायक खुलासे

Written by:Rohit Shinde
Published:
9 जून रोजीच्या मुंब्रा लोकल अपघाताबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यामध्ये अपघाताच्या कारणाबाबत काही खुलासे करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंब्रा लोकल अपघाताचा अहवाल समोर; अहवालात अनेक धक्कादायक खुलासे

मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, दोन्ही लोकल ट्रेनमध्ये अवघे 0.75 मीटरचे अंतर होते. विशेष म्हणजे, दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये काही जणांनी जीव गमावला होता, त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

एका प्रवाशाची चूक महागात पडली?

दोन्ही लोकल ताशी 75 किमी वेगाने धावत होत्या. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाने दरवाज्याजवळ उभं राहताना बाहेर हात काढला होता आणि त्याच्या खांद्यावर बॅगही होती. त्याच प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडला. आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाश्यांना लागल्याने एका मागे एक इतर प्रवासी देखील पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशाच्या चुकीमुळे अनेकांनी जीव गमावल्याच समोर आलं आहे.

याच घटनेत बाजूने धावणाऱ्या दुसऱ्या लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांनाही धक्का बसल्याने ते देखील खाली पडले असावेत, असे निरीक्षण अहवालात नोंदवले गेले आहे.

अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं ?

मुंब्रा येथील लोकल ट्रेन अपघात ९ जून २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. दोन विरुद्ध दिशेतील फास्ट लोकल ट्रेन त्या वेळी अंदाजे ७५ किमी/तासाच्या वेगाने जवळून जात होत्या, ज्यामुळे ८ प्रवासी फुटबोर्डवरून खाली पडले. प्राथमिक चौकशेनुसार, एक प्रवासी त्याच्या खांद्यावरची बॅग सांभाळताना संतुलन गमावून लटकला, ज्यामुळे इतर प्रवाशीही खाली पडले. या भीषण घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ३ जखमी झाले.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews