Municipal Corporation Mayor Lottery : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत कोण होणार महापौर? कोणाच्या नावांची चर्चा?

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबईसह महामुंबईत महापौर सोडतीत काय समोर आलंय, आणि कोण आहेत दावेदार?
Municipal Corporation Mayor Lottery : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत कोण होणार महापौर? कोणाच्या नावांची चर्चा?

मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. मुंबईत सर्वसाधारण महिला वर्गाचा महापौर असणार आहे. मुंबईच्या महापौर सोडतीवर आक्षेपही घेण्यात आलेत. आता मुंबईसह महामुंबईत महापौर सोडतीत काय समोर आलंय, आणि कोण आहेत दावेदार?

मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण महिला वर्गाचा महापौर

ठाण्यात एससी, कल्याण डोंबिवलीत एसटी महापौर

मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 130 महिला नगरसेवक निवडून आल्यात. त्यापैकी भाजपच्या 49 तर शिंदे शिवसेनेच्या 19 नगरसेविका आहेत. भाजपाचा महापौर झाला तर भाजपाच्या 49 नगरसेविकांपैकी कुणाला संधी मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत.

कोण होणार मुंबईचा महापौर?

रितू तावडे, भाजप
राजश्री शिरवडकर, भाजप
अलका केरकर, भाजप
हर्षिता नार्वेकर, भाजप
आशा मराठे, भाजप
शीतल गंभीर, भाजप

अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत महापौरपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा होती. मुंबईत सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप केला. ही सोडत आधीच ठरवून काढण्यात आली असल्याचा आरोपही पेडणेकरांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले.

ठाणे महापालिकेत अनुसूचित जातीचा महापौर

ठाणे – अनुसूचित जाती
1. सुलेखा चव्हाण, शिंदे शिवसेना
2. दर्शना जानकर, शिंदे शिवसेना
यांची नावं चर्चेत आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनुसूचित जमातीचा महापौर कल्याण- अनुसूचित जमाती
हर्षाली थविल – शिंदे शिवसेना
किरण भांगले – शिंदे शिवसेना
किरण भांगले – मनसे
ही नावं चर्चेत आहेत.

नवी मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग महिला महापौर
नवी मुंबई- खुला प्रवर्ग (महिला)
नेत्रा शिर्के- भाजप
माधुरी सुतार- भाजप
वैष्णवी नाईक- भाजप

उल्हासनगरमध्ये ओबीसी महापौर
उल्हासनगर – ओबीसी
राजेंद्र चौधरी, शिंदे शिवसेना
डिंपल ठाकूर, शिंदे शिवसेना
इंदिरा पाटील, शिंदे शिवसेना
अश्विनी निकम, शिंदे शिवसेना
यांच्या नावांची चर्चा आहे.

भिवंडीत खुल्या प्रवर्गाचा महापौर
भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
प्रशांत लाड, काँग्रेस
तारिक अब्दुल बारी मोमीन, काँग्रेस
मयुरेश पाटील, कोणार्क विकास आघाडी
प्रतिभा पाटील, कोणार्क विकास आघाडी
यांच्या नावांची चर्चा आहे.

महापौरपदाची सोडत निघाल्यानंतर आता येत्या आठवडाभरात सगळ्याच महापालिकात महापौर निवड होईल असं दिसतंय. मुंबईसह महामुंबईत महापौर निवडीत कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागणार आहे.

 

Follow Us :GoogleNews