मर्डर, मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, सगळं केलं आणि एवढ्या उंचीवर गेले, कौतुक करताना भरत गोगावले बोलले गंभीर

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
नारायण राणेंनी मर्डर केल्या, मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, एवढं सगळं केलं म्हणून नारायण राणे एवढ्या उंचीवर गेले. असं गोगावले म्हणाले. गोगावलेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे.
मर्डर, मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, सगळं केलं आणि एवढ्या उंचीवर गेले, कौतुक करताना भरत गोगावले बोलले गंभीर

Bharat Gogavale : मंत्री भरत गोगावले हे आपल्या बिनधास्त स्वभावासाठी व रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा मंत्री गोगावलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं गोगावलेंच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी समाचार घेतला आहे. तर कोकणात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी गोगावलेंवर टिका केली आहे. तर रायगडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोगावलेंनी वादग्रस्त वक्तव्यामुळं माफी मागण्याची मागणी केली. त्यामुळं मंत्री भरत गोगावले हे माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत

नेमकं भरत गोगावले काय म्हणाले?

दरम्यान, सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान खासदार नारायण राणेंचे कौतुक करताना मंत्री गोगावलेंनी अतिशय धक्कादायक व गंभीर बोलले. नारायण राणेंनी मर्डर केल्या, मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, एवढं सगळं केलं म्हणून नारायण राणे एवढ्या उंचीवर गेले. असं गोगावले म्हणाले. नारायण राणे यांना मी जवळून पाहिलं आहे. त्यांनी अंगावर अनेक केसेस घेतल्या आहेत. अनेक भानगडी केल्या, मर्डर केल्या म्हणून ते एवढ्या उंचावर गेले. असं भरत गोगावले म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे हजर होते. त्यामुळं पावसाळी अधिवेशनात गोगावलेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे.

गोगवलेंनी माफी मागावी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची बैठक झाली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तसेच भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. पण निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. तर गोगावलेंच्या वक्तव्यानंतर रायगडमधील भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, जोपर्यंत गोगावले माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही महायुतीसाठी काम करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळं मंत्री भरत गोगावले हे माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews