Marathi News

माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजना; आगामी काळात ३०% सवलत मिळण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये घर खरेदी करताना 30 टक्क्यापर्यंत सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजना; आगामी काळात ३०% सवलत मिळण्याची शक्यता

गेल्या काही वर्षांत सिडकोच्या काही योजनांना अत्यल्प असा प्रतिसाद मिळाला. अशा स्थितीत लॉटरीमध्ये घर मिळून ही अनेकांनी ही घरं वाढत्या किंमती मुळे सरेंडर केली आहे. या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही घरं पडून आहेत. या घरांच्या किंमतीचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. आमदार विक्रांत पाटील, शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा लक्षवेधी द्वारे मांडला. शिवाय या घरांच्या किंमती 50 टक्कांनी कमी कराव्यात अशी मागणी केली. त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.

आगामी काळात ३०% सवलतीने घर मिळणार?

घरांच्या किंमती बाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. ज्यावेळी किंमती जास्त असतात त्यावेळी म्हाडाने दर कमी केले आहे. सिडको बाबतीत ही सरकार त्या दृष्टीने विचार करेल. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची बैठक घेतली जाईल. अधिवेश काळात ही बैठक व्हावी असा आपला प्रयत्न असेल. या बैठकीत सिडको घरांच्या दरा बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

घराच्या किंमती कमी होणार? सरकार सकारात्मक

सिडकोच्या घरांच्या किंमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करता येतील का याचा विचार सरकार करत असल्याचं यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितलं. सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल असं ही ते म्हणाले. त्यातून सिडको लॉटरीधारकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे आगामी काळात सरकार काय निर्णय घेते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

EWS साठी असलेल्या घरांच्या किंमती या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या होत्या. शिवाय घरं ही आकाराने लहान असल्याची अनेकांची तक्रार होती. याबाबत सिडकोकडेही सर्वांनी पाठपूरावा केला होता. मात्र सिडकोने दर कमी करणार नाही असं ही स्पष्ट केलं आहे.  त्यामुळे आता सरकार आणि सिडको संगनमताने काही निर्णय घेते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews