अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्थानक हे इंग्रजकालीन आहे. त्याचे नाव अहमदनगर रेल्वे स्थानक असे होते. जिल्ह्याचे नाव बदलल्यावर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. अखेर आता राज्य सरकारने राजपत्र जाहीर करत या नामांतरावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता स्थानकाचे नामांतर आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.
अहिल्यानगर रेल्वे स्थानक म्हणून मान्यता
अहिल्यानगर शहरातील सर्व कार्यालयांची नावे अहिल्यानगर झाली मात्र, रेल्वे स्थानकाचे नाव बदलले नव्हते. या विरोधात अनेक निवेदने हिंदू संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आली. अखेर राज्य सरकारने काढले राजपत्र काढत रेल्वे स्थानकाचे नामकरण अहिल्यानगर केल्याचे जाहीर केले. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. नागरिकांच्या या मागणीनंतर महायुती सरकारने नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला. नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर खरंतर रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मागणीने जोर धरला होता.
नागरिक आणि संघटनांच्या लढ्याला यश
अहिल्यानगर नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी केले आहे. अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वे स्टेशन देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले होते. याबाबत खरंतर अनेक संघटना आणि नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्याला यानिमित्ताने खरंतर सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांमधून या निर्णयाचे आता स्वागत होताना दिसत आहे.





