जिंदाल कंपनीच्या नाशिकमधील सर्वात मोठ्या युनिटमध्ये आगडोंब, नेमकं कारण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
नाशिकच्या जिंदाल कंपनीच्या युनिटमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. नेमकं अवघं युनिट आगीच्या भक्ष्यस्थानी कसं गेलं? दुर्घटना घडली कशी, जाणून घेऊ...
जिंदाल कंपनीच्या नाशिकमधील सर्वात मोठ्या युनिटमध्ये आगडोंब, नेमकं कारण काय?

आशिया खंडातील जिंदाल कंपनीच्या नाशिकमधील सर्वात मोठ्या युनिटमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. तब्बल साडेसहा हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे.  13 लाईनमध्ये आग पसरल्याची बातमी आहे. जिंदालमध्ये या आधी देखील आगीच्या घटना घडल्या आहेत. आता या घटनेबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

आगीचा भडका का उडाला?

कंपनीतील सर्व माल जळून खाक झाल्यास तब्बल साडेसहा हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या उद्योजक सुरक्षा समितीने दिलेल्या माहितीनुसार, ”जिंदालमध्ये पॉलिफिल्म, पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्याने आगीचा भडका कायम आहे. जिंदालचा आशिया खंडातील हा सर्वात मोठा प्लांट आहे. साडेसात हजार कामगार याठिकाणी काम करतात. शॉर्ट सर्किटमुळे एकूण 13 लाईनमध्ये आग लागली.”

जिंदालमध्ये सातत्याने आगीच्या घटना

यापूर्वी, 2023 च्या जानेवारी महिन्यातही इगतपुरीतील या कंपनीत भीषण स्फोट झाला होता, ज्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले होते. या घटनेत आग लागण्याचे कारण बॉयलर नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. या सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कंपनी प्रशासनाने या घटनांनंतर सुरक्षा उपाययोजना सुधारण्याचे आश्वासन दिले असले तरी तशा कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसते.

या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेची सखोल तपासणी करण्याची आवश्यकता आहे, तसेच कंपनी प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांचा सामना करावा लागणार नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews