Municipal Corporation Election Results 2026 : यंदाच्या महापालिका निवडणुकांनी राज्यात अनेक नेत्यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केलं, त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुप्रिया सुळे. शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा असलेल्या सुप्रिया सुळेंच्या पक्षाची महापालिका निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झालीय. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शरद पवार राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीत पिछेहाट झाली असून राज्यात 15 महापालिकांत पक्षाला भोपळा मिळाला आहे.
सुप्रिया सुळे यांचं पुढे काय होणार?
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढलेल्या शरद पवार राष्ट्रवादीलाही मोठा फटका सहन करावा लागला. शरद पवार प्रचारापासून लांब राहिले, अजित पवार ठाम मांडून होते, मात्र पक्षाचा चेहरा असलेल्या सुप्रिया सुळेही महापालिका निवडणुकीच्या प्रचारात फारशा दिसल्याच नाहीत. अजित पवार यांच्या बंडापूर्वीच शरद पवार राष्ट्रवादीची धुरा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे सोपवली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात विधानसभा निवडणुकांपासून ते आत्ताच्या महापालिका निवडणुकांपर्यंत पक्षाच्या कामगिरीत सातत्यानं घटच पाहायला मिळतेय.
शरद पवार राष्ट्रवादीची कामगिरी
1. 2024 विधानसभा निवडणुकीत 10 आमदार
2. नगरपरिषदांच्या निवडणुकीत केवळ 7 ठिकाणी नगराध्यक्ष
3. बारामती नगरपरिषदेत केवळ एका सदस्याचा विजय
4. महापालिका निवडणुकीत केवळ 36 जागी विजय
5. पिंपरी चिंचवड, नगर, जळगावसह 15 महापालिकांत भोपळा
महापालिका निवडणुकांत पुणे, पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांशी पक्षानं आघाडी केली खरी, मात्र सुप्रिया सुळे प्रचारात फारशा दिसल्या नाहीत. त्यातच दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चाही सुरुय. पवार काका-पुतणे कायमचे एकत्र येणार की नाहीत, या संभ्रमाचा फटका निवडणुकीत बसताना दिसतोय. या सगळ्या निकालावर सुप्रिया सुळे मात्र यावर आत्मचिंतन करायला हवं इतकंच सांगतायेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत अनेक नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागला
या नेत्यांच्या नेतृत्वाचा कस
उद्धव ठाकरे –
मुंबई महापालिकेतील सत्ता गमावली
मुंबईत मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या नेत्याची ओळख
राज ठाकरे-
उद्धव ठाकरेंसोबत महापालिकांत सत्ताधाऱ्यांशी लढत
मराठी अस्मितेचा चेहरा ओळख मिळवण्यात यश
देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचं निर्विवाद नेतृत्व अशी प्रतिमा
विधानसभा, नगरपरिषदा, महापालिकेत यशस्वी
एकनाथ शिंदे
शिंदे शिवसेनेचा राज्यभर विस्तार करण्यात यश
विधानसभा, नगरपरिषदा, महापालिकेत चांगलं यश
अजित पवार
सत्तेत सहभागी, पक्ष संघटनेचाही विस्तार
विधानसभा, नगरपरिषदा, महापालिकेत शरद पवार राष्ट्रवादीपेक्षा चांगलं यश
इम्तियाज जलील
संभाजीनगरसह राज्यभरात एमआयएमचा चेहरा
महापालिकेत राज्यभरात 114 जागा
GFX OUT
या सगळ्या नेतृत्वात सुप्रिया सुळेंचं स्थान काय असा प्रश्न विचारण्यात येतोय. सुप्रिया सुळेंचं पुढं काय होणार याची चर्चा रंगतेय. राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यास कोण, या प्रश्नाच्या पहिल्या तीन नावांत सुप्रिया सुळेंचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं खरं, मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या तीन निवडणुकांत पक्षाची कामगिरी निराशाजनक मानण्यात येतेय. शरद पवार सक्रिय राजकारणापासून अलिप्त होत असताना, सुप्रिया सुळेंकडून राज्यातील जनतेला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. येत्या काळात केंद्रातल्या राजकारणासोबतच राज्यातल्या राजकारणावरही सुप्रिया सुळेंना त्यांची पकड मजबूत करुन स्वताला सिद्ध करावं लागेल.





