सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तसेच खासगी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी आज अनेक तरूण-तरुणी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत आता एसटी महामंडळाकडून एक गुडन्यूज समोर आली आहे. महामंडळाने नुकतीच 367 उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील कुशल तरुणांना सरकारी सेवेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. नाशिक विभागीय कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या भरतीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
367 जागांसाठी प्रशिक्षणार्थी उमेदवारांची गरज
यामधये समोर आलेल्या माहितीनुसार या जागा प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरल्या जाणार आहेत. खरंतर महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) तरुणांना करिअर घडवण्याची एक मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. महामंडळाने नुकतीच 367 उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील कुशल तरुणांना सरकारी सेवेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
हे ही वाचा
नोकरी मिळविण्यासाठी काय आवश्यक?
प्रामुख्याने आयटीआय आणि अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक उमेदवारांसाठी आहे. ही भरती प्रशिक्षणार्थी पदासाठी जाहीर करण्यात आली असून प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे. इच्छुक उमेदवारांचे वय 14 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
ही भरती अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक, मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर या पदांसाठी होणार आहे.या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर खालीलप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे अर्ज नमुना मिळणार आहे. तो भरुन सबमिट करायचा आहे.
त्यामुळे या निमित्ताने आयटीआय पूर्ण केलेल्या किंवा अभियांत्रिकी पदवीधर तरूणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे सरकारी नोकरीतील आपले करिअर तरूणांना सुरू करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अशा संधीच्या शोधात असाल त्वरीत ही संधी साधा.