मुंबईतील पॉश एरियात घर मिळविण्याची संधी; म्हाडाकडून दादर, पवईतील घरांसाठी खास योजना

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील अत्यंत महाग अशा समजल्या जाणाऱ्या दादर, ताडदेव या परिसरात मुंबईकरांना हक्काचं घर मिळू शकतं. म्हाडाच्या या योजनेची लवकरच अंबलबजावणी केली जाईल.
मुंबईतील पॉश एरियात घर मिळविण्याची संधी; म्हाडाकडून दादर, पवईतील घरांसाठी खास योजना

म्हाडाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी मिळत आहे. वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेक कुटुंबांना स्वतःचे घर घेणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत म्हाडाच्या गृहनिर्माण योजना आशेचा किरण ठरत आहेत. परवडणाऱ्या दरात आणि पारदर्शक लॉटरी प्रक्रियेद्वारे घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये या योजना राबवल्या जात आहेत. म्हाडाच्या योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. ही योजना नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारी ठरत आहे. अशा परिस्थितीतून म्हाडाकडून लवकरच एक खास योजना आणली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील दादर, पवई, ताडदेव या पॉश एरियात घराचे स्वप्न साकारण्याची संधी नागरिकांना या नव्या स्किममुळे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

म्हाडाची योजना नेमकी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार एकूण 100 घरांची विक्री केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबईतील महागड्या अशा पवई, दादर, ताडदेव अशा प्रतिष्ठीत भागात ही घरे आहेत. तीन वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांनी प्रतिसाद न दिल्याने विक्री न होऊ शकलेल्या घरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. म्हाडाने अशी शंभर घरे निवडली असून ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार आहेत. मुंबईतील तुंगा, पवई, दादर, ताडदेव अशा एकदम चकचकीत भागात ही घरे आहेत. त्यामुळे आता मुळ मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी आता चालून आली आहे.

सामान्यांना घरे परवडणार का?

म्हाडाची सोडत निघाली की घरे खरेदी करायला अक्षरश: हजारो अर्ज येतात. म्हाडाची घरे इतर खासगी विकासकांच्या घरांपेक्षा फारच स्वस्त असतात. म्हणूनच ही घरे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. या घरांसाठी लॉटरी काढली जाते. ज्या अर्जदाराचे नशीब चांगले, त्यालाच हे घर मिळते. आता म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर तुंगा, दादर, ताडदेव, पवई या भागातील घरांची विक्री करणार आहे. परंतु मुंबईतील महागड्या भागात ही घरे असल्याने या घरांची किंमतही कोट्यवधी रुपयांत आहे. त्यामुळे जरी म्हाडाने योजना आणली असली तरी ही घरे कोट्यवधींच्या घरात आहेत, त्यामुळे अशी घरे खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल का, हा सवाल मा