शनिवारी मध्यरात्री देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गा़ड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. रेल्वेकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांना मात्र यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेकडे या संदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्याची माहिती समोरय येत आहे.
रेल्वेगाड्या 5 तास उशिराने; प्रवाशांना मनस्ताप
या घोटाळ्यामुळे पंचवटी, सेवाग्राम, गरीब रथ, हावडा मेल, राजधानी एक्सप्रेस, मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत.नाशिक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर नाशिक-देवळाली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा पूर्वी अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा वायर तुटली होती. ती ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे पूर्ण झाल्यावर नाशिकरोड जवळ वायर तुटली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे ही वाचा
नाशिकमधील बिघाड कल्याणमध्ये फटका
शिक आणि इगतपुरी दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये बिघाड झाल्याने कल्याणहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा ब्रेकडाऊन झाला आहे. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले तरी, रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या बिघाडामुळे कल्याणहून इगतपुरीकडे जाणाऱ्या सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यापैकी सहा गाड्या वसई रोडमार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. एकंदरीतच मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप संपताना दिसत नाही.