भंडारदरा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण असून, अलीकडच्या काळात येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात हिरवाईने नटलेले डोंगर, ओसंडून वाहणारे धबधबे आणि धुक्याने वेढलेले दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात. विल्सन धरण, आर्थर तलाव, रंधा धबधबा यांसारखी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी राज्यभरातून आणि बाहेरूनही लोक येतात. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बोटिंगच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तरुणाईला हे ठिकाण विशेष आवडते. शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे कुटुंबांसाठीही हे एक उत्तम पर्यटन पर्याय ठरत आहे. सोशल मीडियावरील फोटो व व्हिडिओंमुळे भंडारदऱ्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
भंडारदऱ्यात प्रशासनाचे नवे नियम
15 ऑगस्ट शुक्रवार त्यांनतर शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्यांची गर्दी पाहत अनेकजण फिरायला जाण्याचे प्लान करतात. त्यातच नगरकर तुम्हीही भंडारदरा परिसरात फिरायला जाणार असाल तर त्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. सलग सुट्ट्या यामुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश दिले आहेत. राजुर पोलीस स्टेशन हद्दीत भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरीशचंद्रगड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, वाल्मीक ऋषीं आश्रम कोदणी अशी प्रेक्षणीय स्थळे येतात.
याठिकाणी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तसेच 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर पुणे, नाशिक, ठाणे-मुंबई व आसपासचे तालुक्यातील संगमनेर, अकोले, श्रीरामपुर, ईगतपुरी व ईतर महत्त्वाच्या शहरातील पर्यटकांची मोठी गर्दी ही होत असते. 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असे सलग 03 दिवस सुट्टी असल्याने सदर दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
सदर भागातील रस्ते हे अरुंद असुन काही रस्त्यांचे दुरुस्तीचे काम चालु आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या तीन दिवस सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत शेंडी भंडारदरा येथील वाहतुक एकेरी करणे आवश्यक असल्याने अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक,सोमनाथ घार्गे, यांनी शेंडी -भंडारदरा या मार्गावरील वाहतुक बंद करून खालील पर्यायी मार्गाने एकेरी करणेबाबतचा आदेश दिला आहे.
भंडारदरा इतका फेमस कसा?
भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे निसर्ग आपल्या मनमोहक रूपात दिसतो. विल्सन धरण, आर्थर तलाव, रंधा धबधबा आणि छत्रीधबधबा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. धुक्याने वेढलेली डोंगररांग, हिरवीगार शेते आणि धबधब्यांचा सुरेल नाद पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. येथे ट्रेकिंग, कॅम्पिंग, बोटिंग यांसारख्या क्रियाकलापांचा आनंद घेता येतो. पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह आणि थंड हवामान प्रवास अधिक आनंददायी बनवते. निसर्गप्रेमी, फोटोग्राफी प्रेमी आणि शांत वातावरणात विश्रांती शोधणाऱ्यांसाठी भंडारदरा हे एक आदर्श ठिकाण आहे.





