पीएमपीएमलची बससेवा फक्त आता पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागापुरती मर्यादीत राहणार नाही. तर आता लोणावळ्यासाठी विशेष पर्यटन बस चालवली जाणार आहे. खरंतर पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्याला विशेष पसंती मिळत असते. अशा परिस्थितीत आता पुढे प्रवाशांना या विशेष बससेवेचा मोठा फायदा होणार आहे.
पीएमपीएमएलची नवी पर्यटन बससेवा सुरू!
पुणे ते लोणावळा – आता प्रवास पर्यटनाचा अशी टॅगलाईन देत पीएमपीएमएलने ही नवी बससेवा सुरू केली आहे. पीएमपीएमएलची नवी पर्यटन बससेवा सुरू झाल्याने आता यानिमित्ताने प्रवाशांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणेकरांना आवडत्या लोणावळा पर्यटनस्थळांना भेट देण्याची आता सुवर्णसंधी या निमित्ताने निर्माण झाली आहे. दि. १८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) लोणावळा पर्यटन बससेवा सुरू होत आहे.
पहिल्याच दिवशी २ बसचे बुकिंग होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा
बस कोणत्या ठिकाणांना भेटी देणार?
- एकवीरा देवी मंदिर
- कार्ला लेणी
- वॅक्स म्युझियम
- भुशी डॅम
- मनशक्ती ध्यान केंद्र
बस सुटण्याची ठिकाणे आणि वेळापत्रक
संबंधित विशेष पर्यटन बस दररोज पुणे स्टेशन,स्वारगेट,डेक्कन पीएमपीएमएल बसस्थानक या भागातून सुटणार आहे. यासाठी प्रवाशांना आधी बुकींग करून घ्यावे लागणार आहे. बुकिंगची वेळ: सकाळी ७ ते रात्री ९ अशी असणार आहे. या विशेष सेवेमुळे लोणावळ्यातील पर्यटन वाढीला चांगली चालना मिळणार आहे. शिवाय पर्यटकांना सुरक्षित असा प्रवास आणि सोबत पर्यटन असा आनंद मिळणार आहे.