पुण्यातील विमाननगर, बाणेर परिसरातील स्पा सेंटर्सवर पोलिसांच्या धाडी; अनेक तरूणी ताब्यात

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे शहरातील विमानतळ भागातील एका नामांकित स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे बेकायदेशीररित्या देह व्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले.
पुण्यातील विमाननगर, बाणेर परिसरातील स्पा सेंटर्सवर पोलिसांच्या धाडी; अनेक तरूणी ताब्यात

स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेटवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या विमानतळ तसेच बाणेर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एकूण 18 मुलींची सुटका केली आहे. यामध्ये 10 हून अधिक परदेशी मुलींचा समावेश असल्याने, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी तपास गरजेचा असल्याचे पोलिसांचे मत आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

गातील एका नामांकित स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे बेकायदेशीररित्या देह व्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत 16 पीडित तरूणींची सुटका करण्यात आली. त्यापैकी 10 महिला परदेशी असून उर्वरित 6 भारतीय आहेत. या प्रकरणात स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर येथील एका लक्झरी स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. येथे दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तपासातून समोर आले आहे की, ग्राहकांकडून ‘थेरपी’च्या नावाखाली हजारो रुपये आकारून त्यांचा वापर देह व्यापारासाठी केला जात होता. या स्पा सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

दोन्ही प्रकरणांमध्ये विमाननगर व बाणेर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित स्पा सेंटर्सच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. विशेषतः परदेशी महिलांना भारतात कशा प्रकारे आणले गेले, याबाबत चौकशी सुरू असून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विशेष टीम कार्यरत आहे. बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अशा स्पा सेंटरवर सातत्याने कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद ठिकाणांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे हे कारवाईचे सत्र चालूच राहणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews