पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाला आहे. ते पुण्यातील एका कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या 2 महिन्यांपासून अटकेत होते. खराडी भागामध्ये पोलिसांनी एका ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर यांच्या विरूद्ध पुरावे सापडल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. मात्र आता तब्बल 2 महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाबद्दल आता संशय व्यक्त केला जात आहे.
प्रांंजल खेवलकरांना जामीन
पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. गंभीर मुद्दा हा अंमली पदार्थांचा होता. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केलं हा कळीचा मुद्दा होता. त्याच मुद्यावर आजचा जामीन त्यांना मिळालेला आहे. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. उद्या त्यांची येरवडा कारागृहातून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रकरण नेमकं काय ?
ण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता. या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता. शिवाय अंमली पदार्थ आढळून आल्याने प्रांजल खेवलकरांसमोरील अडचणी वाढल्या होत्या.
शिवाय या प्रकरणात खेवलकर यांनी काही महिलांटे शोषण केल्याचा आरोप देखील राज्य महिला आयोगाकडून करण्यात आला होता. रूपाली चाकणकर यांनी देखील प्रांजल खेवलकरांवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची जामीनावर उद्या सुटका होऊ शकते.





