Marathi News

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

Sanjay Shirsat : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

दरम्यान, या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार…

दरम्यान, स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.

निधींची कमतरता भासू देणार नाही…

दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची सुद्धा पाहणी केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आणि या स्मारकाबाबत लागणाऱ्या अन्य बाबी तसेच अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच या स्मारकासाठी कोणताही निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews