Marathi News

Pune Nagpur Special Train : पुण्यावरून नागपूरसाठी विशेष रेल्वेसेवा!! या स्थानकांवर थांबा मिळणार

Published:
पुणे ते नागपूर स्पेशल ट्रेनला महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे
Pune Nagpur Special Train : पुण्यावरून नागपूरसाठी विशेष रेल्वेसेवा!! या स्थानकांवर थांबा मिळणार

सध्याचे दिवस हे हिवाळ्याचे असून याच महिन्यात ख्रिसमस सारखा महत्त्वाचा सण साजरा होतोय, तर दुसरीकडे नवीन वर्षाची सुद्धा आतुरतेने वाट बघितली जाते. साहजिकच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यावर उपाय म्हणून रेल्वे विभागाने महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरातून विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे. यातीलच एक मार्ग म्हणजे पुणे ते नागपूर रेल्वेमार्ग… या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या बघता रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल.या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील.ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Pune Nagpur Special Train

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार –

या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील.  पुणे ते नागपूर स्पेशल ट्रेनला महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. सणासुदीच्या कालावधीत नागपूर–पुणे मार्गावरील तिकिटे सहसा लवकर संपतात. अशा वेळी विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने अतिरिक्त मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल. प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews