महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी (Railway News) मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने एक विशेष साप्ताहिक रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी महत्वाची ठरेल. महाराष्ट्रातील एकूण 9 रेल्वे स्थानकावर ही ट्रेन थांबेल ज्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होईल. या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ती कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबेल याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
कोणती ट्रेन सुरू झाली – Railway News
पश्चिम रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने राजकोट ते महबूबनगर यादरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर यादरम्यान चालवली जाणार आहे. ही रेल्वे दर सोमवारी दुपारी 1:45 वाजता राजकोट येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता महबूबनगर स्थानकावर पोहचेल.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?
राजकोट ते महबूबनगर यादरम्यान धावणारी ही विशेष साप्ताहिक रेल्वे (Railway News) वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पुर्णा, हजूर साहिब नांदेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, मेडचाळ, काचेगुडा, उमदानगर आणि शादनगर अशा रेल्वे स्थानकावर थांबेल. यामध्ये महाराष्ट्रातील 9 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तुम्हीही जर या मार्गावरून रेल्वे प्रवास करणार असाल तर ही माहिती लक्षात ठेवा.






