युतीच्या बातम्यांवरुन राज ठाकरेंचा संताप, म्हणाले राजकीय भूमिका मांडायची तर..

Written by:Smita Gangurde
Published:
महापालिका निवडणुकांच्या आधी याबाबतचा निर्णय होईल, या माध्यमांत आलेल्या बातम्यांवर राज ठाकरे संतापले आहेत.
युतीच्या बातम्यांवरुन राज ठाकरेंचा संताप, म्हणाले राजकीय भूमिका मांडायची तर..

मुंबई- उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, हा सध्या राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. उद्धव ठाकरे यांनी खुलेपणानं एकत्र येणार असल्याचं जीहर केलं असलं तरी राज ठाकरे यांनी मात्र अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. इगतपुरीत झालेल्या मनसेच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घएतल्या मात्र युतीबाबत काय निर्णय घेणार हे जाहीर केलेलं नाही. निवडणुकांच्यातयारीला लागा, इतकेच आदेश त्यांनी या शिबिरात कार्यकर्त्यांना दिले आहेत.

दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या आधी याबाबतचा निर्णय होईल, या माध्यमांत आलेल्या बातम्यांवर राज ठाकरे संतापले आहेत. मराठी विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी त्याचा संबंध नाही, असं राज ठाकरे इगतपुरीत अनौपचारिक गप्पांत बोलले होते. मात्र माध्यमांनी त्यात महापालिका निवडणुकांच्या आधी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशा बातम्या केल्यानं राज ठाकरे संतापले आहेत.

युतीबाबत आता काही सांगणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या शिबिरात म्हटलंय युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन, तुम्ही काहीही बोलायचं नाही, अशाही महत्वाची सूचना राज ठाकरेंनी या शिबिरात दिल्याचं समजतंय

राज ठाकरे यांची पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला.
त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं.
त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलंत्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.
त्यानंतर काही निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले
अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन!’

उद्धव ठाकरे मात्र आग्रही

ठाकरे बंधू 5 जुलैला एकाच मंचावर आल्यापासून युतीची चर्चा सुरु आहे. मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य करु लागलेतवाढदिवसानिमित्त होणाऱ्या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंनी राज आता सोबत असल्याचं विधान केलं आहे. अशा स्थितीत राज ठाकरे मात्र यावर स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. पदाधिकाऱ्यांनीही याबाबत भाष्य करु नये, असा आदेशच त्यांनी काढलेला आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या मनात काय चाललंय? उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही? हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय

 

Follow Us :GoogleNews