नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण आणि तरूणींसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. सिडको महामंडळात गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सिडकोत सध्या 2797 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी तब्बल 1619 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा मोठा ताण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येत आहे. तसेच मोठ्या संख्येत कर्मचारी निवृत्त सुद्धा होत आहेत. त्यामुळेच नोकर भरती करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता सिडकोत लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
1,619 पदांसाठी होणार भरती
सिडकोतील कर्मचाऱ्यांची रिक्त संख्या लक्षात घेता आता मोठी मेगाभरती केली जाणार आहे. सिडको प्रशासनाने 2025 या वर्षात बॅकलॉक भरुन काढण्याचे नियोजन केले आहे. चालू वर्षात विविध संवर्गातील आवश्यक पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे 2025 या वर्षभरात भरली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहात असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. शहर आणि औदद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोमध्ये रोजगाराच्या आणि जीवन विकासाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.
अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींना एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सिडकोच्या वतीने नुकतीच 160 पदांची भरती जाहीर केली होती. या भरती प्रक्रियेसाठी नुकतीच ऑनलाईन परीक्षा सुद्धा पार पडली. त्यानंतर आता सिडकोच्या वतीने मेगाभरती घेण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. या मेगाभरतीच्या संदर्भातील जाहिरात लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या पदासाठी आणि किती पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे अधिकृत जाहिरात समोर आल्यानंतरच इच्छुक उमेदवारांना पुढील हालचाली करता येणार आहेत.