Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. विदर्भ वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील २४ तासात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपुर, गडशिरोली, चंद्रपूर , भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ऑरेन्ज आणि यलो अलर्ट कुठे?
आज मुंबई, उपनगर, पुणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उंच लाटांचा इशारा…
दरम्यान, आज मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं समुद्र किनारी न जाण्याचा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण आणि ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. समुद्रकिनारी 3.4 ते 4.2 मीटर उंचीचा लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसाची शक्यता…
दुसरीकडे राज्याती काही भागात पावसामुळे अतिवृष्टीची होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, उपनगर, रायगड, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान समुद्रामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.





