कीर्तनावरुन संगमनेरचं राजकारण तापलं, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण; भाजपासह हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक

Written by:Smita Gangurde
Published:
कीर्तनकार संग्रामबापू भंडारेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हाव लागेल असा इशारा दिला.
कीर्तनावरुन संगमनेरचं राजकारण तापलं, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण; भाजपासह हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक

संगमनेर– कीर्तनाच्या कार्यक्रमावरुन अहिल्यानगर जिल्ह्यात नवा वाद रंगलाय. अहिल्यानगरात शनिवारी संगमनेरच्या घुलेवाडीत संग्रामबापू भंडारे यांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनात मुद्दा आध्यत्मावरून भरकटल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना राडा घातला. विशेष म्हणजे हा आक्षेप घेणारा व्यक्ती होता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक.

त्यामुळं यावरुन कीर्तनकार संग्रामबापू भंडारेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हाव लागेल असा इशारा दिला.

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

संग्रामबापू भंडारेंच्या कीर्तनात झालेल्या गोंधळावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात . आमदार अमोल खताळ आणि आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला. पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने हातात निषेध फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते
यावेळी आमदार अमोल खताळांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतावर निशाणा साधत त्यांचा डीएनए तपासावा लागेल अशी टीका केली
संग्रामबापू महाराज भंडारे यांच्या कीर्तनात अबजलखान आणि औरंगजेब यांचा उल्लेख झाला.तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे. हे आम्हाला शोधावं लागलं. तुम्हाला औरंगजेबाचा पुळका का आला. यासाठी तुमचा डीएनए तपासावा लागेल, अशी टीका खताळ यांनी केलीय. तर याला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी संगमनरेचे आमदार अमोल खताळ यांची बौद्धित पात्रता काढलीय.

नेमकं काय घडलं?

श्रावण महिन्याच्या निमित्ताने या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र 16 ऑगस्टला संग्रामबापू भंडारेंच्या कीर्तनात काँग्रेसनं गोंधाळ घातला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत महाराजांवर हल्ला केल्याचा आरोप होतोय. त्यामुळं याप्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले बाळासाहेब थोरात यांच्या घरात घराणेशाही व हुकूमशाही आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने थोरातांचा पराभव घडवून आणल्याने त्यांना अस्वस्थता आली आहे, अशी टीका भाजपानं केलीय.

संगमनेरमध्ये झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय कीर्तनकार वर्ग बदनाम होतोय. थोर संतपरंपरेतून आलेलं हे कीर्तन कुठल्या वळणावर आलंय? यात कुठल्या राजकीय पक्षांचे अजेंडा राबवला जातोय का? विठुरायाचं नाव घेत कीर्तन करणारे नथुरामचं नाव का घेतायत? प्रश्न असा उपस्थित होतोय