मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संतोष धुरी भाजपात प्रवेश करणार?
संतोष धुरी यांची प्रतिक्रिया समोर
संतोष धुरी यांनी मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. मी अजिबात नाराज नाही. दुपारनंतर माझा राजकीय निर्णय सांगेन. मला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. मी गेल्या दोन दिवसांत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन, असे संतोष धुरी म्हणाले.






