Republic Day Wishes 2026 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा…

Published:
प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६ जानेवारी) आपल्या प्रियजनांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीत शुभेच्छा पाठवून देशप्रेमाचा उत्सव साजरा करा.
Republic Day Wishes 2026 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा…

भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाला देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा दिवस अभिमान आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हीही मित्रमंडळी व प्रियजनांना ‘या’ शुभेच्छा पाठवून देशाप्रती देशभक्ती वाढवू शकता….

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा….

आपला देश, आपले संविधान आणि
आपली लोकशाही यांचा अभिमान बाळगूया
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन हा देशभक्ती, जबाबदारी
आणि एकतेचा संदेश देतो
तो आपण सर्वांनी आत्मसात करूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग
करून भारताला जागतिक स्तरावर अग्रगण्य बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस देशासाठी काहीतरी
चांगले करण्याची प्रेरणा देतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताच्या लोकशाहीचा पाया मजबूत आहे
कारण त्यामागे संविधानाची ताकद आहे
या ताकदीला सलाम!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशासाठी
योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वंदन
चला देशासाठी एकत्र पुढे जाऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

संविधानाचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान
हा विचार कायम मनात ठेवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन आपल्याला अधिकारांसोबत
कर्तव्यांचीही जाणीव करून देतो
एक जबाबदार भारत घडवूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंगा, संविधान आणि लोकशाही यांचा
अभिमान बाळगणारा भारत सदैव प्रगती करो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर सर्व भारतीयांना
एकतेचा, शांततेचा आणि प्रगतीचा संदेश देतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करूया
आणि देशाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहूया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस देशासाठी काहीतरी
चांगले करण्याची प्रेरणा देतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews