सध्या संपूर्ण महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याचं उभं पीक पाण्याखाली गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारकडून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे..मात्र याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Flood Affected Farmers) यांनी मात्र वेगळीच भीती व्यक्त केली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबेल असं म्हणत या अभूतपूर्व परिस्थितीत सरकारने तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यात कमी पाऊस आहे त्या जिल्ह्यात आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद ,परभणी, नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने जलद गतीने पंचनामे करावे आणि तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
हे ही वाचा
पवारांनी व्यक्त केली मोठी भीती ? Sharad Pawar On Flood Affected Farmers
पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे फक्त पिकांचे नुकसान झालं म्हणून मदत करून उपयोग नाही, तर पिकांसोबत जमीन आणि पाणंद रस्ते यांचे पंचनामे करावे लागतील. गुरं देखील वाहून गेली आहेत यांचे पंचनामे जलद गतीने करावे लागतील. हि मदत न केल्यास शेतीमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात अशी भीतीही शरद पवारांनी व्यक्त केली. Sharad Pawar On Flood Affected Farmers
…. तरच बळीराजा वाचेल –
सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मदतीचे काम वेगाने करावे लागणार आहे. पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे . काही मंत्री प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. ही चांगली बाब आहे. शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील, याचा सरकारला विचार करावा लागेल. तरच बळीराजा वाचेल, त्यातून मोठे संकट टळेल, असे शरद पवार यांनी म्हंटल.