कांदा आणि सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. रविवार, 28 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात आज शेतमालाच्या दरात पुन्हा चढ उतार दिसून येत आहेत. कांद्याचे दरही काहीसे कमी झाले आहेत. सोयाबीनच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण झाली आहे. एकूणच दर कसे राहिले, ते सविस्तर पाहू…
हे ही वाचा
बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरले
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 हजार 277 क्विंटल इतकी झाली. यापैकी 795 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 600 ते 1650 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 417 क्विंटल कांद्याला प्रतीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 297 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 269 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3700 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा आणि छत्रपती संभाजी नगर मार्केट मध्ये 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सोयाबीनच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे.