Sanjay Raut – गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्ती आणि मराठी भाषेवरून चांगलंच वातावरण तापलं आहे. त्यातच खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना पटक पटक के मारेंगे…असं आव्हान दिलं होतं. यानंतर खासदार निशिकांत दुबे हे मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो. मात्र त्या राज्यातील मातृभाषेचा आदर केला पाहिजे, पण जर त्याला ती भाषा बोलता येत नसेल तर हिंसाचार… किंवा त्याला मारहाण करणं चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

काय उखडायचे आहे ते उखडा…

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. दुसरीकडे मराठी भाषेच्या सक्तीवरून मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीची एकप्रकारे पाठराखण केल्यानंतर मराठी मुद्द्यावरून आम्ही काहीही करायला तयार आहे… वेळप्रसंगी हिंसाचारी करायला तयार आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे. काय उखडायचे आहे ते उखडा असं खुलं आव्हान खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. आता तुमचे नेते मुंबईत येत आहेत, म्हणून तुम्ही त्यांचे पाठराखण करताय. परंतु मुंबई, महाराष्ट्रात मराठीच बोलली जाणार असं राऊत म्हणाले.

आमचे 105 बापजाद्ये हुतात्मे झालेत…

या मुंबईसाठी आमचे 105 बापजाद्ये हुतात्मे झाले आहेत. तुम्ही हुतात्म दिले नाही आहे. आणि इथे जो येतोय त्याला मराठी बोलावच लागेल. मराठीचा आदर करावाच लागेल. मराठीच्या मुद्द्यावरून आम्ही काही करायला तयार आहे. तुम्हाला जे करायचे ते करा, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी कराल, सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून तु्म्ही शांत आहात. पण मुख्यमंत्री पदावरून दूर गेला तर निश्चितपणे तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी कराल. अशी टिका राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

आम्हांला शिकवू नका…

मराठीबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आम्हाला शिकवू नका. या मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठीसाठी शिवसेनेचे … बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. मराठी बद्दल यांचे नेते वाईट बोलणार आम्ही आणि आम्ही शांत बसायचे. जर कुठल्याही नेते किंवा त्यांचे नेते मुंबईत येत असतील महाराष्ट्राचे येत असतील तर त्यांना मराठीत बोलावच लागेल. यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. तुम्हाला जे काही करायचे ते करा, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री याला काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.