Marathi News

राज्यात सातारा, बीड, धुळे, जालना आणि सोलापुरात सौर ऊर्जेची क्रांती, किती मेगावॅट वीजनिर्मिती?

Written by:Astha Sutar
Published:
राज्याचे एकंदरीत सौर क्षमता ८ लाख ४६६. ५० मेगावॅटपर्यंत पोहोचले असून, यात रूप-टॉप सौर ऊर्जा प्रकल्प ३ लाख 32 हजार 84 हजार मेगावॅट आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प 50 मेगावॅट यांचाही समावेश आहे.
राज्यात सातारा, बीड, धुळे, जालना आणि सोलापुरात सौर ऊर्जेची क्रांती, किती मेगावॅट वीजनिर्मिती?

मुंबई – सध्या उन्हाळ्याच्या हंगामा आहे. त्यामुळे तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या काळात लोड शेडिंगला लोकांना सामोरे जावे लागते. सर्वत्र विजेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्यामुळे वीज कपात केली जाते. किंवा लोड शेडिंग असते. मात्र महाराष्ट्रात सौर ऊर्जेच्या बाबतीत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेने क्रांती केल्याचं आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यानी 8 हजार 450 मेगावॅट वीजनिर्मिती केल्याची माहिती समोर आली आहे.

कोणते जिल्हे आघाडीवर?

दरम्यान, राज्यातील स्वच्छ उर्जेच्या प्रवासात राज्याने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. तसेच आठ हजार पन्नास मेगावॅट वीज निर्मिती केली आहे. यात राज्यातील अनेक महत्त्वाचे जिल्हे आघाडीवर आहेत. यामध्ये सोलापूर, सातारा, बीड, जालना आणि धुळे हे जिल्हे आघाडीवरती आहेत. यांच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी सरकारकडूनही पाठिंबा मिळाला आहे. तर राज्याचे एकंदरीत सौर क्षमता ८ लाख ४६६. ५० मेगावॅटपर्यंत पोहोचले असून, यात रूप-टॉप सौर ऊर्जा प्रकल्प ३ लाख 32 हजार 84 हजार मेगावॅट आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प 50 मेगावॅट यांचाही समावेश आहे.

देशभरात 24 सौर उद्याने कार्यान्वित…

दुसरीकडे देशभरात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे निर्मिती होत आहे. आणि सौरऊर्जेची गरज भासत आहे त्यामुळे संपूर्ण देशात 24 सौर उद्याने कार्यान्वित आहेत. तर महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे एकूण दोन लाख 866 हजार 66 मेगावॅट क्षमतेचे 11 सौर प्रकल्प देखील आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेची निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही सौर ऊर्जेच्या प्रकल्पांनाही मंजूरी देण्यात आली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews