दिवा-सीएसएमटी जलद लोकल सुरु करा, 5 व 6 वी मार्गिका CSMT पर्यंत लवकर कार्यान्वित करा, खा. श्रीकांत शिंदेंची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
रेल्वे प्रवाशांची दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी आहे, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. पूर्वी दिवा येथे जलद लोकलला थांबा नव्हता, मात्र आता दिवा येथे जलद लोकल थांबतात.
दिवा-सीएसएमटी जलद लोकल सुरु करा, 5 व 6 वी मार्गिका CSMT पर्यंत लवकर कार्यान्वित करा, खा. श्रीकांत शिंदेंची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Local Train Accident – मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदेंनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळं शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला.

लोकल १५ डब्ब्यांच्या झाल्या पाहिजेत…

दरम्यान, लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली, मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच १२ डब्ब्यांच्या लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तीत करणे तितकेच गरजेचे आहे, लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

लोकल फेऱ्या वाढल्यामुळं गर्दीचे नियोजन होईल…

कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. या अपघातात सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून, या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले.