Eknath Shinde : विदर्भ वगळता आज राज्यात शाळा सुरु झाल्यात. आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शाळेत उपस्थित राहत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून, या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सर्व विषयात ज्ञान मिळवावे…
दरम्यान, सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 205-26 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यातत आलेल्या शाळेचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे.
शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे…
शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षणकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.





