MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

सायरन वाजला, मदतीसाठी सैन्य धावले; पुण्यात मॉक ड्रिल यशस्वी

Written by:Arundhati Gadale
Published:
डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले.
सायरन वाजला, मदतीसाठी सैन्य धावले; पुण्यात मॉक ड्रिल यशस्वी

पुणे : भोंगा वाजला त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट झाला, र अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल मदतीला धावून आले. ही खरी युद्ध परिस्थिती नव्हती तर पुणे शहरात घेतण्यात आलेले माॅक ड्रील होते. ते यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली.

मॉक ड्रिल 25 मिनिटांत पूर्ण

डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. यानुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहीका सेवा वेळेत उपलब्ध करुन देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया 25 ते 60 मिनिटात पूर्ण करण्यात आली.

सहा ठिकाणी झाले मॉक ड्रिल

विधानभवन प्रांगण, पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत, वनाज औद्योगिक परिसर, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगरपरिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थान विभाग, रेड क्रॉस सोसायटी, तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्टीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मॉक ड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी सांगितले.