Raj Thackeray – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रित मोर्चा निघण्यापूर्वीच सरकारनं निर्णय घोषित करुन पुढचं आंदोलन टाळलंय. त्रिभाषेचा दोन जीआर सरकारने रद्द केल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येताहेत. दरम्यान, राज ठाकरेंनी आता एक्सवरुन पोस्ट करुन महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन केलं आहे.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 29, 2025





