सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार, प्रवेशाबाबत मला माहिती नाही, बावनकुळे काय म्हणाले?

Written by:Astha Sutar
Published:
माझी हकालपट्टी का केली, याचे कारण सांगितले नाही. त्यामुळे मी आता भाजप पक्षात जाणार आहे. जिथे मानसन्मान मिळेल. तिकडे जाण्याचा मी निर्णय घेतला असल्याचं सुधाकर बडगुजरांनी सांगितले आहे.
सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार, प्रवेशाबाबत मला माहिती नाही, बावनकुळे काय म्हणाले?

Sudhakar Badgujar – काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या हाकलपट्टी करण्यात आली होती. मात्र आपल्याला पक्षातून का काढले, याचे योग्य कारण अद्याप समजले नाही, असे सुधाकर बडगुजरांनी सांगितले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितले आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांसह ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत.

पक्षप्रवेशाला विरोध…

दुसरीकडे नाशिकमधून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सुधाकर बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्यास नकार दिला होता. याबाबत पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतले होती. माता गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा विरोध मावळला होता. यानंतर आता सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह ते नाशिकहून मुंबईकडेच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मला माहिती नाही…

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या भाजपातील प्रवेशाला काही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांचा विरोध होता. तो विरोध आजही आहे. परंतु जर ते भाजपात प्रवेश करणार असतील तर त्याबाबत मला काही माहीत नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आणि आपण 18 वर्षे एका पक्षात काम केले. तिथे मानसन्मान मिळाला नाही. माझी हकालपट्टी का केली, याचे कारण सांगितले नाही. त्यामुळे मी आता भाजप पक्षात जाणार आहे. जिथे मानसन्मान मिळेल. तिकडे जाण्याचा मी निर्णय घेतला असल्याचं सुधाकर बडगुजरांनी सांगितले आहे.