शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यास तटकरे-पटेलांचा विरोध, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Written by:Astha Sutar
Published:
एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्या उद्धव ठाकरेंशी चांगला संवाद होता. परंतु आता या तिघांमध्ये मतभेद आहेत. तरीही हे तीन नेते महायुतीत एकत्र आहे. हे सर्वजण भीतीपोटी, दहशतीपोटी एकत्र असल्याची टिका खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली.
शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यास तटकरे-पटेलांचा विरोध, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

mumbai – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असताना, शरद पवार-अजित पवार हे दोन पवार कुटंबियांनी एकत्र यावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना, आता यावर खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र न येण्यावरुनही संजय राऊतांनी थेट खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकत्र येण्यास तटकरे-पटेलांचा विरोध…

दरम्यान, प्रत्येकजण आपल्या तोटा, फायदाचा विचार करत आहे. यंत्रणापासून कसे दूर राहू हे बघत आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रदेशाध्यक्ष एक करावा लागेल. अजित पवार गटातील नेते आजही म्हणत आहेत की, शरद पवार आमचे नेते आहेत. दोन पवार एकत्र येण्यावर चर्चा करत असतात. मात्र प्रत्येकजण राजकारणात स्वत:ची व्यवस्था बघत आहेत. पण अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

प्रत्येकाने पुस्तक वाचावे…

काहीजण ईडीला घाबरून भाजपात गेले… काहीजणांनी ईडीचा सामना केला. त्यामुळे हे पुस्तक मी जसं अनेकांना पाठवलं आहे. तसे राज ठाकरेंनाही पाठवले आहे. कारण राज ठाकरे हे उत्तम वाचक आहेत. आणि ते अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. म्हणून मी राज ठाकरेंनाही पुस्तक पाठवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. मी ‘नरकातला स्वर्ग’ हे माझे पुस्तक सर्व राजकीय नेत्यांना पाठवले आहे. राज ठाकरे यांनाही ईडीने फास आवळण्याचा कसा प्रयत्न केला होता…. त्यांचीही सीबीआयने चौकशी केली होती. ईडीनेही संपत्तीबाबत चौकशी केली होती. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांची चौकशी केली होती.