शिवसेना वर्धापनदिनी दोन्हीकडून टीझर जारी, शक्ती प्रदर्शनासह ठाकरे तोफ डागणार की, शिंदे बाजी मारणार?

Written by:Astha Sutar
Published:
गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका पुढील चार महिन्याच्या आत होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी हा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.
शिवसेना वर्धापनदिनी दोन्हीकडून टीझर जारी, शक्ती प्रदर्शनासह ठाकरे तोफ डागणार की, शिंदे बाजी मारणार?

Shivsena 59th Anniversary – आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेने अनेक मोठमोठे नेते घडवले. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्याचा शिकवले. मात्र गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेची दोन शकलं पडल्यामुळे दोन शिवसेना आणि दोन वर्धापन दिन साजरी होत आहेत.

दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून षण्मुखानंद हॉल येथे सायंकाळी वर्धापन दिन साजरा होतोय. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वरळीतील डोम येथे वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यामुळे दोन्ही सेनेकडून शक्तिप्रदर्शन करत आगामी पालिका निवडणुकीच्या आधी हा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

दोन्हीकडून टीझर जारी…

दरम्यान, आज वर्धापन दिन साजरा होत असताना शिवसेना शिंदे गटाकडून काल टीझर जारी करण्यात आला आहे. त्यात आपण हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राला वाहून घेतले आहे. हा महाराष्ट्राचा एकनाथ आहे, असं टीझरमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेकडून ही टीझर जारी करण्यात आला असून, त्यात मराठी अस्मिता, हिंदुत्व टीझरमध्ये सांगण्यात आले आहे.

कोण कोणावर तोफ डागणार…?

पालिका निवडणुकीच्या आधी वर्धापन दिन महत्त्वाचा मानला जातोय. उद्धव ठाकरे शक्ती प्रदर्शनासह एकनाथ शिंदे आणि सरकारवर तोफ डागणार असल्याचे बोलले जाते. तर एकनाथ शिंदे मागील तीन वर्षातील विकासाचा पाढा वाचणार असल्याचे बोलले जाते. आपण कोणती काम केली. समाजासाठी काय केलं. हे सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करत एकमेकावर तोफ डागणार आहेत. त्यामुळे कोणाचा वर्धापन दिन सरस ठरणार? कुठे गर्दी होणार? आणि कोण वरचढ ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.