मार्च-एप्रिलमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण, सरकारकडून किती कोटीची मदत?

Written by:Astha Sutar
Published:
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, या नुकसानी पोटी १०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.
मार्च-एप्रिलमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण, सरकारकडून किती कोटीची मदत?

State Government : मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांवर झाला होता. या नुकसानीचे पंचनामे व्हावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती, पण आता अखेर मार्च एप्रिल महिन्यातील अवकाळीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.

सर्वांधिक नुकसान कोणत्या विभागात…

दरम्यान, अवकाळीचे सर्वाधिक नुकसान नागपूर विभागात झाले आहे. १००९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर २६२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, यासाठी २७ कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. तर कोकणात ३१८८ हेक्टर क्षेत्र, ९२५९ शेतकऱ्यांचे नुकसान, ११ कोटी मदतचा प्रस्ताव, पुणे विभागात २६९२ हेक्टर, १२२२९ शेतकऱ्यांचे नुकसान, ७ कोटी ४१ लाख रुपयांची मदत प्रस्तावित, राज्यात एकूण अवकाळीमुळे ३४ हजार ७६० हेक्टर जमिन पिकांचे नुकसान, राज्यात एकूण ८ हजार ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे नुकसान यासाठी एकूण १०० कोटी रुपयांची मदतीचा प्रस्ताव आहे.

किती हेक्टर क्षेत्रावर परिणाम…

राज्यातील ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अवकाळीमुळं ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, या नुकसानी पोटी १०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्च-एप्रिल महिन्यातील अवकाळीमुळं जवळपास राज्यात ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याची माहिती आली होती. तर