Marathi News

सामान्य माणूस व पोलीसांतील संबंध अधिक दृढ व्हावेत, ‘कॉमन मॅन-पोलीस शिल्पा’चे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनवारण

Written by:Astha Sutar
Last Updated:
या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेला दगड घडविण्याचे श्री.पवार आणि श्री.आतारकर यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सामान्य माणूस व पोलीसांतील संबंध अधिक दृढ व्हावेत, ‘कॉमन मॅन-पोलीस शिल्पा’चे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनवारण

Common Man Police Sculpture – पोलीस आणि सामान्य माणूस यांचे एक अतूट नात आहे. पोलीस हे समाजातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी काम करतात. त्यामुळं पोलीस आणि सामान्य माणूस यांचा मोठ्या प्रमाणात संबंध येतो. दरम्यान, त्याच ‘कॉमन मॅन‍ आणि पोलीस शिल्पा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-१ नाशिक येथील अनावरण करण्यात आले.

दोघांतील संबंध अधिक दृढ व्हावेत…

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन‍ आणि पोलीस शिल्पा’ अनावरण करण्यात आल्यानंतर यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेला दगड घडविण्याचे श्री.पवार आणि श्री.आतारकर यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी कॉमन मॅन-पोलीस शिल्पाची संकल्पना आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘कॉमन मॅन‍-पोलीस शिल्पातून अतूट नांत अधोरेखित…

पोलीस हे समाजातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी काम करतात. तसेच समाजातील वाईट कृत्य आणि वाईट गोष्टीवर आळा घालण्यासाठी पोलीस रात्रदिवस सामान्य माणसांसाठी काम करत असतात. पोलीस आणि सामान्य माणूस यांचे एक अतूट नात आहे. हे अतूट नांत ‘कॉमन मॅन‍ आणि पोलीस शिल्पा’ यातून अधोरेखित होते. असं यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews