देशातील पहिला सांस्कृतिक ‘रेडिओ महोत्सव’ २१ जून रोजी मुंबईत होणार, ‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
देशाच्या स्वातंत्र्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांचा रेडिओ हा साक्षीदार आहे. यात आकाशवाणी, खासगी एफएम चॅनेल, कम्युनिटी रेडिओ आदींची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 
देशातील पहिला सांस्कृतिक ‘रेडिओ महोत्सव’ २१ जून रोजी मुंबईत होणार, ‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळा

Radio Festival – रेडिओ क्षेत्राने गौरवशाली इतिहास समोर आणला आहे. देश आणि राज्याची कला, क्रीडा, पंरपरा, संस्कृती, नाट्य, सिनेमा आणि ऐतिहासिक परंपरा जपणे आणि त्यांची माहिती… त्यांचा इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम रेडिओतर्फे झाले आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारतर्फे आणि सांस्कृती विभागाकडून देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक रेडिओ महोत्सव महाराष्ट्रातील मुंबईत २१ जून रोजी होणार आहे. यात रेडिओ क्षेत्रातील नामवंताचा ‘आशा रेडिओ पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे.

ऐतिहासिक घटनांचे रेडिओ साक्षीदार…

दरम्यान, रेडिओने ऐतिहासिक उपक्रमाच्या माध्यमातून माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचवली आहे. विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती आजही रेडिओतर्फे केल्या जातात. दरम्यान, हा रेडिओ महोत्सव २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे 4.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थितीत राहणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी सांगितली.

महाराष्ट्र भूषण आशा भोसलेंच्या नावाने पुरस्कार

दुसरीकडे सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे आणि यातून उदयोन्मुख कलाकर पुढे यावे, यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. १२ रेडिओ पुरस्कार हे ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ हा संगीत क्षेत्रातील महत्वाचे नाव असणारे “महाराष्ट्र भूषण आशा भोसले” यांच्या नावाने देण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांचा रेडिओ हा साक्षीदार आहे. यात आकाशवाणी, खासगी एफएम चॅनेल, कम्युनिटी रेडिओ आदींची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

१२ जणांचा सन्मान होणार…

या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार वेगळा देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र आशा सर्वोकृष्ट रेडीओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडीओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ सामाजिक कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम असे १२ पुरस्कार देण्यात येणार आहेत.