हिंदी आणि त्रिभाषेचा निर्णय तूर्त रद्द, मात्र राज्यात मराठी भाषिकांची संख्या किती? कोणत्या भागात जास्त मराठी भाषिक?

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
हिंदीसह राजस्थान, गुजराती, कन्नड आणि तेलगू भाषिकांची उपस्थितीही राज्यात मोठी आहे.
हिंदी आणि त्रिभाषेचा निर्णय तूर्त रद्द, मात्र राज्यात मराठी भाषिकांची संख्या किती? कोणत्या भागात जास्त मराठी भाषिक?

मुंबई- राज्यात सध्या हिंदी आणि त्रिभाषा सूत्रावरुन वाद सुरु आहे, यात राज्यात मराठी भाषिकांची नेमकी संख्या किती, याची आकडेवारी समोर आलीय. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याच्या 11 कोटींच्या लोकसंख्येत 8 कोटी मराठी भाषिक आहेत. तर सर्वाधिक मराठी बोलणाऱ्या जिल्ह्यांत सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा समावेश आहे.

महाराष्ट्राची ओळख मराठी भाषेमुळे असली तरी अनेक भाषा, बोली राज्यात एकत्र नांदतात 2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील 8 कोटी जनता ही मराठी भाषिक आहे.

राज्यात मराठी भाषिकांची संख्या किती?

1. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333
2. या लोकसंख्येतील 8 कोटी म्हणजे 69 टक्के मराठी भाषिक
3. पश्चिम महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्या 90 टक्के
4. मुंबई महानगरात केवळ 35 टक्के मराठी भाषिक
5. साताऱ्यात 95.05 टक्के जनता मराठी भाषिक
6. भंडाऱ्यात 93.19 टक्के जनता मराठी भाषिक
7. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 91.02 टक्के मराठी भाषिक
८. कोल्हापूर चौथ्या स्थानी, 89.16 टक्के मराठी भाषिक
९. पुण्यात 78.17 टक्के, संभाजीनगरमध्ये 69.66 टक्के मराठी भाषिक
१०. सर्वात कमी मराठी भाषिक नंदुरबारमध्ये, 16.06 टक्के मराठीचा वापर

हिंदी भाषेचा किती प्रभाव?

मराठी ही राजभाषा असली तरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर हिंदी आहे. त्याखालोखाल उर्दू, राजस्थानी, गुजराती, तेलगू आणि कन्नड भाषिकांची संख्या आहे

1. राज्यात 1.09 कोटी म्हणजे 9.7 टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक
2. उर्दू भाषिकांची संख्या 6.71 टक्के, सुमारे 75 लाख
3. मुंबईत सर्वाधिक 25 टक्के, पुण्यात 20 टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक
4. नागपूरसह विदर्भात हिंदी भाषिकांची संख्या मोठी
5. अकोल्यात उर्दू भाषिकांचे प्रमाण 17.33 टक्के

राज्यातील इतर भाषिकांची स्थिती काय?

हिंदीसह राजस्थान, गुजराती, कन्नड आणि तेलगू भाषिकांची उपस्थितीही राज्यात मोठी आहे.

1. राज्यात 2.24 टक्के म्हणजे 25 लाख लोकसंख्या राजस्थानी भाषिक
2. मराठवाडा, विदर्भात बंजारा समाजात राजस्थानी भाषेचा वापर
3. यवतमाळ, वाशिममध्ये राजस्थानी भाषिकांची संख्या मोठी
4. राज्यात 2.11 टक्के म्हणजे 23 लाख गुजराती भाषिक
5. मुंबई, ठाणे, पावघरमध्ये गुजराती भाषिकांची संख्या अधिक
6. मुंबईत 11.48 लोकसंख्या गुजराती भाषिक
7. राज्यात 23 लाख लोकसंख्या कन्नड आणि तेलगू भाषिक
8. सीमावर्ती भागात कन्नड,तेलगूचा प्रभाव, सोलापूर प्रमुख केंद्र

भाषिक विविधता ही राज्यासाठी सांस्कृतिक समृद्धी मानण्यात येते. इतर भाषिकांनी राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातलीय.
विविध भाषांचा संगम आणि एकमेकांच्या संस्कृतीचा स्वीकार हे राज्याच्या एकात्मतेचं वैशिष्ट्य आहे.