Marathi News

सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी उड्डाणपुलाचे नाव ‘सिंदूर’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्नाक उड्डाणपुलाचे लोकार्पण

Written by:Astha Sutar
Published:
भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे.
सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी उड्डाणपुलाचे नाव ‘सिंदूर’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्नाक उड्डाणपुलाचे लोकार्पण

Karnak flyover – रेल्वे मार्गावरील पूल उभारणीची कार्यवाही आव्‍हानात्‍मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने यशस्‍वीपणे पूल उभारणी केली, दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा सिंदूर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पालिकेने पूर्ण केले आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आज त्यांच्या हस्ते कर्नाक उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले.

सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक…

भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे करण्यात आले आहे. ‘सिंदूर’ नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे देखील फडणवीस यांनी नमूद केले. दक्षिण मुंबईत, मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणाऱया सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते.

सिंदूर पूलाच्या पुनर्बांधणीचे फायदे

– मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि’मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
– सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीमुळे अनेक वर्षापासून बाधित झालेली पूर्व -पश्चिम वाहतूक आता सुलभ होणार.
– सिंदूर पूल कार्यान्वित झाल्यावर पी डि’मेलो मार्ग व पुढे शहीद भगतसिंग मार्गावरील विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेद बिंदूवरील (junction) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
– सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीने युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार.

पुलाचे आकारमान –

– संपूर्ण पूलाची (प्रकल्पाची) लांबी – ३४२ मीटर
– लोहमार्गावरील पूल: आर.सी.सी. आधारस्तंभांवर (पीअर) प्रत्येकी ५०७ मेट्रिक टन वजनाचे, ७० मीटर लांब व २६.५० मीटर रुंद व १०.८ मीटर उंच असे दोन गर्डर, आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
– महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्ते : लांबी – २३० मीटर (पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस – १०० मीटर), आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.

सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीची ठळक वैशिष्ट्ये :

– पोहोच रस्त्याचे काम १२ महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित असताना संपूर्ण पोहोच रस्त्याचे काम प्रत्यक्षात ७ महिन्यात पूर्ण करण्यात आले.
– पूर्वेकडील संपूर्ण काम पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंत अवघ्या ४ महिन्यात पूर्ण झाले आहे.
– हे काम कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते. महानगरपालिकेने ते यशस्वीपणे पूर्ण केले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews